आम्ही निदर्शने टाळली तर आमचं चुकलं का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |


mu_1  H x W: 0



मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् या विभागातील काही विद्यार्थ्यांनी सोमवारी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांची मदत घेत संचालक योगेश सोमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु याउलट विभागाच्या इतर काही विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा न घेता योगेश सोमण यांना पाठिंबा देणारे निवेदन रजिस्टार अनिल देशमुख यांच्याकडे सादर केले. याचे रजिस्टार अनिल देशमुख यांच्याकडून या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देण्यात आली. परंतु संध्याकाळी मात्र निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दबाव व त्यांना असणाऱ्या राजकीय संघटनांच्या दबावापोटी संचालक योगेश सोमण यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानिर्णनांतर यावर बोलताना समर्थन देणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत निराशा व्यक्त केली व आम्ही निदर्शन ना करता शांततेत मागण्या केल्या म्हणजे आमची चूक झाली काय ? असा प्रश्न उपस्थित केला.





याविषयी समर्थानात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता तुमच्या समर्थनात कोणत्या विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा आहे का ? याबाबत विचारणा केली असता तिने उत्तर दिले कि,"आम्ही याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत. निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या यापूर्वीच पूर्ण करण्यात आल्या होत्या. निदर्शने करत वर्गाबाहेर बसण्यापेक्षा आम्ही तासांना हजर राहणे योग्य समजले. योगेश सरांनी आम्हाला कायम मदत केली. ते विद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर असतात."

 





पुढे निदर्शक विद्यार्थ्यांबाबत त्यांनी सांगितले कि,"निदर्शन करणारे विद्यार्थी विभागात होणाऱ्या तासिकांना हजर नसतात. त्यामुळे त्यांना शिक्षक कसे शिकवतात याबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही. तसेच सरांच्या वैयक्तिक विचारसरणीचा कोणताही प्रभाव किंवा आसक्ती आम्हा विद्यर्थ्यांवर नाही. तसेच आज आलेल्या विद्यापीठाच्या निर्णयावर आम्ही नाराज आहोत. कारण 'झिरो इयर कंपनसेशन'ची मागणी आम्ही नियमित विभागात हजर असणाऱ्या विद्याथ्यांचे नुकसान करणारी आहे. तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार ७५ टक्के हजेरी भरत नसल्याकारणाने या विद्यार्थ्यांनी यातून पळवाट शोधली आहे. परंतु याबाबत आमच्याशी चर्चा करणे विद्यापीठाला महत्वाचे वाटतं नाही का ?" असा प्रश्नही उपस्थित केला.

 

@@AUTHORINFO_V1@@