भगव्यामय ग्रंथदिंडीला संमेलनाध्यक्ष फादर दिब्रेटो गैरहजर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


उस्मानाबाद : फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे चर्चेत आहे. धार्मिक सुसंवाद व्हावा, अशी भूमिका मांडणारे फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी संतपरंपरेला मिळतीजुळत्या ग्रंथ दिंडीत सहभागी होण्यास नकार दर्शवला आहे. गुरुवारी फादर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

 

दै. मुंबई तरुण भारत च्या प्रतिनिधींनी स्वागताध्यक्ष नितीन तावडेंशी संवाद साधला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या पायाला वात आल्याचे समजले होते. ग्रंथदिंडीत फादर सहभागी होणार असल्याचे तावडे यांनी रात्री सांगितले होते. मात्र, सकाळी अचानक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी ग्रंथदिंडीला दांडी मारली.

 

दरम्यान, उस्मानाबाद शहरात दीडशेहून अधिक ख्रिस्ती धर्मगुरू सहभागी दाखल झाले आहेत. दिंडीत सहभागी होऊ नका असा दबाव चर्चने टाकल्याच्या चर्चा आहेत. मावळत्या संमेलनाध्यक्ष अरूणाताई ढेरे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, आमदार विक्रम काळे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ढाले पाटील यांनी ग्रंथदिंडीची पूजा केली. पालखीत तुळजाभवानीची गौरवगाथा, तुकारामांच्या अभंगाची गाथा, ज्ञानेश्वरी , व भारताचे संविधान आदी पुस्तके ठेवली होती.

@@AUTHORINFO_V1@@