रा. स्व. संघ नेत्यांच्या मारेकर्‍यांचा लष्कराच्या जवानांनी घेतला बदला

29 Sep 2019 16:24:43




हिजबुलचा म्होरक्या ओसामा रामबन चकमकीत ठार


श्रीनगर
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकात शर्मा आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनिल परिहार व त्यांचे भाऊ अजित परिहार यांच्या मारेकर्‍यांचा रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी खात्मा केला. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख कमांडरचा लष्कराच्या जवानांनी रामबन जिल्ह्यातील चकमकीत खात्मा केला. ओसामा रामबन असे त्याचे नाव असून लष्कराने केलेल्या गोळीबारात त्याचे सहकारी जाहिद आणि फारुख यांचाही मृत्यू झाला.



जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात रविवारी पहाटे भारतीय लष्कराचे जवान जंगलात पाहणीसाठी गेले असता यावेळी हिजबुलच्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे नऊ तास याठिकाणी चकमक सुरू राहिली. अखेर रविवारी दुपारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले तर सैन्याचा एक जवान शहीद झाल्याचे समजते.



यावेळी अधिक माहिती देताना लष्कराच्या प्रवक्यांनी सांगितले की या तिन्ही अतिरेक्यांनी सकाळी राजमार्गाजवळ चकमक झाल्यानंतर जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र वाट चुकल्याने ते मुख्य बाजारातील एका घरात घुसले. तेथेच लष्कराच्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातले. यांपैकी ओसाम रामबन हा हिजबुल दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर असून तो वॉण्टेड दहशतवाद्यांपैकी एक होता. १ नोव्हेंबर २०१८ रोजी भाजपचे वरिष्ठ नेते अनिल परिहार आणि त्यांचा भाऊ अजित परिहार तसेच एप्रिल २०१९ मध्ये आरएसएस पदाधिकारी चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या सचिवांची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणात ओसामा याचाच हात होता. ओसामावर अनेक लाखांचे बक्षीस होते. तो किश्तवाड जिल्ह्यात हत्यात हुसकावून घेण्याच्या प्रकरणातही वाँटेड होता. अखेर त्याचा खात्मा करत भारतीय लष्कराने रविवारी याचा बदला घेतला.

Powered By Sangraha 9.0