पंतप्रधान मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा कट

25 Sep 2019 13:42:08


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी विशेष गट तयार करण्याचं काम पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने सुरू केले आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिली. तसेच, जैश- ए- मोहम्मद संघटना भारतातील वायू सेनेच्या तळांवर हल्ल्याचा कट आखत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लष्करी तळांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, कानपूर, गांधीनगर, लखनऊसह एकूण ३० शहरांमध्ये पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांच्याही सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकच्या योजनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच ते पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

Powered By Sangraha 9.0