'हिंदी राष्ट्रभाषा' उल्लेख दाक्षिणात्य राजकारण्यांच्या वर्मी

16 Sep 2019 15:39:23




नवी दिल्ली : हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री यांनी एका कार्यक्रमादरम्यान हिंदी ही जगभरात भारताची ओळख बनेल, असा विश्वास वक्तव्य केला होता. मात्र, दाक्षिणात्य राजकारण्यांनी याला विरोध व्यक्त करत आमच्यावर ही भाषा थोपवत असल्याचा आरोप केला आहे. अभिनेता कमल हसन याने टविट करत 'देश एक भाषा अनेक', अशा आशयाचे ट्विट केले आहे. जेव्हा भारत गणतंत्र बनला, त्यावेळी विविधतेचे वचन देण्यात आले होते. मात्र आता कोणत्या शाह, सुल्तान आणि सम्राटाला याला नाकारता येणार नाही.



 

आपल्या व्हिडिओत कमल हसन म्हणाला, "देशाला अभिमान आहे. सर्वजण एकत्र येत बंगाली भाषेतील राष्ट्रगीत गातात. ज्यांनी राष्ट्रगीत लिहीले त्यांनी प्रत्येक भाषेचा सन्मान केला होता.", असे म्हणत हा व्हिडिओ संपवला आहे. हिंदी दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम झाल्यावरच हा व्हिडिओ कलम हसनतर्फे जारी करण्यात आला. यावेळी जलीकाट्टूपेक्षा मोठा विरोध आम्ही करू, असा इशाराही देण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0