गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

15 Sep 2019 20:50:32



गडचिरोली
: येथील ग्यारापत्ती गावात दोघा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात नक्षलविरोधी पथकाच्या जवानांना रविवारी यश आले. या दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून यांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, तर इतर नक्षलवाद्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला असून या भागातील गस्त वाढविण्यात आल्याची माहिती नक्षलवाद विरोधी पथकाकडून देण्यात आली.


महाराष्ट्र आणि छत्तीसगढ येथील नक्षलग्रस्त भागांत सध्या नक्षलवादविरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे
. या मोहिमेदरम्यान रविवारी सकाळी नरकसा येथील जंगलात काही नक्षलवाद्यांनी नक्षलवादविरोधी पथकाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला.

Powered By Sangraha 9.0