धुळे एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट ; १३ जणांचा मृत्यू तर ४३ जखमी

31 Aug 2019 11:27:38


 


धुळे : धुळ्यामधील शिरपूरजवळील वाघाडी गावात एका केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

स्फोटाच्या तीव्रतेमुळे आजूबाजूच्या परिसरात हादरे बसले, तसेच काही घरांच्या भीतींनाही तडे गेले आहेत. दूरुनही धुराचे लोट दिसत आहे. एमआयडीसीची परिसर शहरापासून दूर असल्यामुळे अनेक कामगार कंपनीच्या परिसरातच राहत होते. त्यांची कुटुंबेही याठिकाणी वास्तव्याला होती. त्यामुळे जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. हा स्फोट झाल्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली. त्यावेळी आणखी काही स्फोट होण्याची शक्यतेने मदतकार्य थांबविण्यातही आले होते. त्यामुळे जखमींवर उपचारासाठी विलंब झाला. जखमींना सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकृती गंभीर असलेल्यांना खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0