वृत्तपत्राच्या 'फेक न्यूज'चे पितळ उघड; 'त्या' बातमीबाबत न्यायालयाचा खुलासा

30 Aug 2019 16:52:22


श्रीनगर : कलम ३७० च्या ऐतिहासिक निर्णयांनंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत होत आहे. सर्व परिस्थिती सामान्य झाली असली, तरीही माध्यमे सरकारच्या या निर्णयावर टीका करत खोट्या बातम्या पसरवित असल्याचे काही दिवसांपासून उघड होत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या अशाच एका खोट्या बातमीचे श्रीनगर उच्च न्यायालयाने पितळ उघडे पाडले आहे.


काश्मीर खोऱ्यातील निर्बंधांमुळे उच्च न्यायालयाचे कामकाज ठप्प असल्याबाबतची काही वृत्तपत्रांनी मागील तीन दिवसांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु काश्मीर खोऱ्यातील इतर काही खोट्या बातम्यांप्रमाणे ही बातमीदेखील खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबतचा खुलासा खुद्द जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या प्रवक्त्यांनीच केला आहे. गुरुवारी एक निवेदन प्रसिद्ध करत प्रवक्त्यांनी न्यायालयाचे कामकाज सुरळीत चालू असल्याचे सांगितले. प्रवक्यांनी सांगितले की
, ५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत ७१ न्यायालयीन प्रकरणे उच्च न्यायालयाच्या श्रीनगर खंडपीठात निकाली निघाली आहेत. त्यापैकी ६ मुख्य खटल्यांचा निकाल खंडपीठाने तर उर्वरित ६५ मुख्य खटल्यांचा निकाल एका खंडपीठाने केला आहे. ज्यामध्ये काश्मीर प्रशासकीय सेवा आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या निवडीसंदर्भात निर्णय देखील जाहीर करण्यात आले. याच काळात जम्मू खंडपीठाच्या ३१२ खटल्यांचा खंडपीठाने निर्णय घेतला असून २४३ खटले एकाच खंडपीठाने निकाली काढले. त्याचबरोबर गौण न्यायालयांमध्येही कामकाज सुरू होते. यातून सुमारे १० हजार खटले निकाली निघाले. त्यामुळे काश्मीरबाबत फेक न्यूजचा सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.


याशिवाय राज्यातील सर्व कागदपत्रांची नोंदणी
, प्रमाणित प्रती व अन्य प्रशासकीय काम उच्च न्यायालय व अधीनस्थ न्यायालयांमध्ये सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे कर्मचारीदेखील त्याच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. यामुळे पुन्हा मुख्य प्रवाहातील डाव्या विचारसरणीच्या माध्यमांकडून पसरविल्या जाणाऱ्या बनावट बातमीदारीचा आणि 'फेक न्यूज'चा मुद्दा समोर येत आहे.

 
Powered By Sangraha 9.0