सिंधू पाठोपाठ मानसीची 'सुवर्ण'कमाल

28 Aug 2019 17:08:39


 

नवी दिल्ली : सध्या क्रीडा क्षेत्रामध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अधिकाअधिक बहरत चालली आहे. भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती. त्यापाठोपाठ मानसी जोशीनेही पॅरा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तिने अंतिम सामन्यात ३ वेळा विश्वविजेती पारुल परमारचा पराभव केला.

 

जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील महिला गटाच्या अंतिम सामन्यात मानसीने हमवतनच्या पारुल पारमारचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. मानसीने पारुलचा २१-१२, २१-७ असा पराभव केला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर मानसीने बोलताना सांगितले की, "हा विजय माझ्यासाठी स्वप्नासारखा असून या विजयाने माझे स्वप्न साकार झाले आहे. मी या विजयासाठी खूप कठीण ट्रेनिंग घेतली आणि याचे फळ मला मिळाले. सुवर्णपदकामुळे नविन उर्जा मिळाली आहे."

Powered By Sangraha 9.0