#PrayForTheAmazon :आगीत धुमसतेय अमेझॉन

22 Aug 2019 15:34:54

 

ब्राझील :जगातील सर्वात मोठ्या सदाहरित अमेझॉन जंगलांना आगीने घेरले आहे. गेले ११ दिवस या जंगलात आगीचे साम्राज्य आहे. जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल अशी जैवविविधता या जंगलांमध्ये आढळते.अमेझॉन हे जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. ते सर्वाधिक कार्बन शोषून ग्लोबल वोर्मिंगचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. परंतु सध्या ही वने आगीमुळे धुमसत आहेत.
 
 
 

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी पर्यावरणीय संघटनांना लक्ष केले आहे. त्यांचं म्हणणे आहे कि, सर्वात मोठ्या वर्षावनाचे संरक्षण करण्यात ब्राझील सरकार अपयशी ठरल्याने त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका होत आहे,असे असल्याने या संघटनांनी त्या जंगलालाच आग लावून दिली आहे. तर दुसरीकडे ब्राझील सरकार या क्षेत्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यास तयार असल्या कारणाने शेतकरी पीक घेण्यासाठी व गुरे चारण्यासाठी म्हणून ही जमीन मोकळी करू पाहत आहेतअसेही आरोप होत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात अमेझॉन क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर आगी लागल्याच्या घटना घडत आहेत. गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या जंगलात सर्वाधिक ३९७५९ इतक्या आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. नासाने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जंगलाला वारंवार आग लागणे ही चिंतेची बाब आहे असेही त्यांनी म्हणले आहे. अ‍ॅमेझॉन वर्षावनाचा सर्वाधिक भाग हा ब्राझील देशात आहे. त्यानंतर पेरू, कोलंबिया, व्हेनेज्युएला, इक्वेडोअर, बोलिविया सुरूनेम यांसारख्या देशांत या वर्षावनाचा भाग आहे.

 
यामुळेच ट्विटरवर #PrayForTheAmazonहा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. भारतात अनेक बॉलिवूड स्टार्सनेही अ‍ॅमेझॉनमधील आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी अ‍ॅमेझॉनमधील आगीचा फोटो शेअर करत, चिंता व्यक्त केली आहे. अ‍ॅमेझॉनचे जंगल आठवडाभरापासून आगीने धुमसते आहे. ही धडकी भरवणारी बातमी आहे. मीडिया याकडे लक्ष देईल, अशी आशा आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे. 
Powered By Sangraha 9.0