एसबीआय खातेधारकांसाठी महत्वाची बातमी : १ ऑगस्टपासून लागू होणार नवे व्याजदर

29 Jul 2019 16:34:25


 


नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) जमा रक्कमेवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. रेपो दरातील घट आणि रोख चलनातील टंचाई यामुळे बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. एसबीआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्याजदरातील ५०-७५ आधार अंकांनी कमी केली आहे. दिर्घकालीन मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये २० आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २ कोटींहून अधिक ठेवींवरील रक्कमेतही पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळणार आहे.

 

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, '४५ दिवसांच्या मुदत ठेवींवर १० वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सात ते ४५ दिवसांच्या मुदत ठेवींवर व्याजदरांमध्ये ४५ आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अशा ठेवींवर ५.७५ टक्के व्याज मिळत होते मात्र, आता ते ५ टक्के इतकेच मिळणार आहे. ४६ दिवसांपासून १७९ दिवसांपर्यंतच्या व्याजदरांवर आता ५.७५ टक्के व्याज मिळेल, त्यापूर्वी हा दर ६.२६ टक्के इतका होता. १८० ते २१० दिवसांच्या व्याजदरांवर १० आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. आता हा व्याजदर ६.२५ टक्के इतका असेल. २११ ते ३६५ इतक्या मुदत ठेवींवर आता ६.२५ टक्के इतकेच व्याज मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0