महाबळेश्वरला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ करण्यास प्रयत्नशील : देवेंद्र फडणवीस

25 Jul 2019 13:25:12

 
 
सातारा : महाबळेश्वर हे माझे स्वतःचे सर्वाधिक आवडते पर्यटनस्थळ आहे. राष्ट्रीय पातळीवर अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या या पर्यटनस्थळाला नजिकच्या काळात आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होण्यासाठी विशेष योजना राबवून. महाबळेश्‍वरच्या विकासासाठी कधीच काही कमी पडू न देता या शहराच्या प्रत्येक प्रश्‍नांत मी स्वत: लक्ष घालेन, अशी ग्वाही देत महाबळेश्‍वरमधील विकासकामांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, महाबळेश्‍वरला '' वर्ग पर्यटन स्थळ दर्जा मिळण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारकडे हा विषय मांडून मान्यता मिळवू असे सांगितले. वेण्णा लेक सुशोभीकरणाच्या आराखड्याबाबत समाधान व्यक्त करून अशा कामात आपण स्वत: लक्ष घालून हे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, यासाठी स्वतंत्र बैठक घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. अस्मिता पाटील, नगरसेवक कुमार शिंदे व शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0