कानडी नाट्याचा प्रयोग फसल्यास कॉंग्रेसला मोठा धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सुरू झालेल्या नाट्याचा गुरुवारी एक अध्याय पूर्ण होईल. मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांना कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकायचा आहे. याबद्दल ते आश्वस्त आहेत. कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी एका बैठकीनंतर एक घोषणा केली. मुख्यमंत्री कुमारस्वामी गुरुवारी ११ वाजता बहुमत सिद्ध करणार आहेत. कर्नाटक भाजतर्फे कुमारस्वामी सरकारविरोधात एक नोटीस दिली आहे.

 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी.एस.येडीयुरप्पा यांनी अविश्वासाच्या प्रस्तावावर म्हणाले कि, या सरकारवर आमचा विश्वासच नाही. सध्या सरकार संकटात आहे. २२५ आमदार असलेल्या या कर्नाटक विधानसभेत १६ जणांनी राजीनामा दिला आहे. आता आमदारांची संख्या २०९ इतकी झाली आहे. त्यामुळे बहुमताच्या आकड्यासाठी १०५ आमदारांची आवश्यकता आहे. भाजपकडे सध्या १०५ आमदारांसह दोन अपक्ष आमदारही आहेत.

 

जेडीएस व कॉंग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष सोडल्यास १०१ आमदार आहेत. आपले सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामी यांनी पूरेपूर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गुरुवारी कॉंग्रेसच्या हातातून कर्नाटक निसटल्यास मोठा धक्का मानला जाईल. लोकसभा निवडणूकीतील पराभवामुळे आधीच कमकुवत बनलेली पक्षाची स्थिती या पराभवामुळे आणखी नाजूक होईल. तसेच देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी ठरेल. देशातील महागठबंधनवरही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. उत्तर प्रदेशात सपा आणि बसप या दोन्ही पक्षांनी पराभवानंतर फारकत घेतली आहे.

 

कुमारस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी जितक्या आमदारांची आवश्यकता आहे, तितके आमदार सत्ताधारी पक्षाकडे अजूनही नाहीत. या दोन दिवसांत कुमारस्वामी यांना त्यासाठीचा वेळ मिळाला आहे. कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार रोशन बेग यांना बंगळुरू विमानतळावरून स्पेशल टाक्स फोर्सने अटक केली आहे. आएमए घोटाळ्यातील आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@