जपमाळेतला मेरूमणी निखळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |


 


मुंबईतल्या रा. स्व. संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक प्रमुख कार्यकर्ते भास्कर राव मुंडले यांचे मंगळवारी सकाळी दु:खद निधन झाले, बातमी समजताच एक फार जुना प्रसंग आठवला. १९६० साली संघाच्या 'प्रथम वर्ष' वर्गासाठी मुंबईहून आम्ही काही स्वयंसेवक गेलो होतो. त्यात भास्कररावही होते. त्या वर्गात प. पु. गुरुजींचा तीन दिवसांचा मुक्काम होता. त्या तीन दिवसात प्रत्येक जिल्ह्यातल्या सर्व स्वयंसेवकांचा गुरुजींशी परिचयाचा कार्यक्रम झाला.

 

त्यातल्या एका दिवशी मुंबईतल्या स्वयंसेवकांचा परिचयाचा कार्यक्रम झाला. सुरवातीला गुरुजींनी विचारले "मुंबईचे किती स्वयंसेवक या वर्गासाठी आले आहेत?" त्यांना संचालन करणाऱ्या कार्यकर्त्याने उत्तर दिले १०९ स्वयंसेवक आले आहेत. त्यावर गुरुजी म्हणाले "अरे वा म्हणजे एका जपमाळेत असलेले १०९ मणीच झाले.

 

एका मालेत १०८ मणी आणि एक मेरू मणी असतो तर आता सांगा या १०९ मण्यांमध्ये मेरू मणी कोण ? त्यावर आम्ही सर्वांनी एका आवाजात "भास्कर राव मुंडले" हे उत्तर दिले त्यावर गुरुजींसह सर्वांनी जो हास्यकल्लोळ केला त्यात गुरुजीही सामील झाले. त्यावेळचे ते गुरुजींचे निर्व्याज व खदखदून हासणे हे अद्याप डोळ्यासमोर आहे. अशा त्या मेरुमण्याला माझी विनम्र श्रद्धांजली...!

- श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@