गुरुकृपा मजवरी राहो सदैव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |



भारताचे कमीत कमी शब्दांत सांगता येईल असे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. कारण, गुरुशिवाय आजच्या जगातही तरणोपाय नाही. असे हे ईश्वराचे सगुण रुप म्हणजे गुरु आणि गुरुचे निर्गुण रुप म्हणजे ईश्वर. गुरूया केवळ दोनाक्षरी शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. गुरूमधील गुम्हणजे अंधकारआणि रूम्हणजे नाहीसा करणे. म्हणजेच, आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवणारे असे गुरू’.

आषाढ शुद्ध पौर्णिमाम्हणजे गुरुपौर्णिमाकिंवा व्यास पौर्णिमाम्हणून साजरी केली जाते. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. व्यासमुनी लिखित महाभारत ग्रंथात धर्मशास्त्र, व्यवहारशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र यांचा समावेश आहे.

गुरुविण कोण दाखविल वाट ।

आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट।

म्हणजेच, गुरू सोबत असल्यास आयुष्यातील अवघड वाटाही अगदी सहज सर करता येतात. त्यामुळे आयुष्यात यशस्वी होण्याकरिता अनेक गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन गरजेचे असते.

मंत्रांच्या संहितीकरणाच्या काळात त्यांचे अध्ययन, अध्यापन, स्वाध्याय आणि विनियोग यांचे शिक्षण देणार्‍या गुरुसंस्थेची आवश्यकता निर्माण झाली. हळूहळू यज्ञकर्म विस्तृत आणि जटिल होऊ लागले आणि त्या विद्येत प्रावीण्य मिळविण्यासाठी विशेष अभ्यासाची निकड निर्माण झाली. त्यामुळेही जाणत्या आचार्यांच्या भोवती शिष्यवर्ग एकत्रित होऊ लागला आणि गुरु-शिष्य परंपरेला सुरुवात झाली.

आई-वडील हे आपले पहिले गुरू. शाळेतले शिक्षक हे आपले दुसरे गुरू. परिजन आणि मित्रमंडळी हे आपल्या दु:खात नेहमी आधारस्तंभासारखे उभे असतात आणि आपल्याला वस्तुस्थितीची जाणीव करून देतात, म्हणून तेही आपले गुरूच आहेत आणि हो, आणखी एक, एक महत्त्वाचा गुरू म्हणजे निसर्ग म्हणावा लागेल. कारण, या निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. हा निसर्गच काही न बोलता आपल्या विविध कृतीतून माणसाला धडा देत असतो. चांगल्या प्रयत्नांचे मधुर फळ, तर प्रदूषणासारख्या मानवनिर्मित दुष्कृतीची परिणती पुढे पुरासारख्या आपत्तीमध्ये होताना दिसते.

माझ्या जीवनात असलेल्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ॥

गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

 

- पंकज यादव सर

मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व वॉर्ड क्र.७२ चे नगरसेवक

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@