पंतप्रधान श्रम योगी पेन्शन योजना : तुम्ही नोंदणी केलीत का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |


नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान श्रम योगी मानधन पेन्शन योजनेचा आत्तापर्यंत ३० लाख लोकांनी लाभ घेतला आहे. असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांना या योजनेद्वारे ६० वर्षांनंतर रुपये ३ हजार इतकी पेन्शन मिळू शकणार असल्याची तरतूद या योजनेत केली आहे.

 

३० लाख लोकांपर्यंत पोहोचली योजना

केंद्रीय श्रम राज्य मंत्री संतोष गंगवार यांनी सोमवारी लोकसभेत याबद्दल माहीती दिली, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी यासाठीची नोंदणी सुरू झाली होती. १० जुलैपर्यंत या योजनेचा ३० लाख ८५ हजार २०५ इकत्या लोकांनी लाभ घेतला. भारतीय जीवन विमा प्राधिकरण (एलआयसी) या कंपनीतर्फे ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.

 

१० कोटी लोकांपर्यंत लाभ पोहोचवणार

येत्या पाच वर्षांत या योजनेला १० कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकराचा मानस आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर येथून नोंदणी केली जाऊ शकते. देशभरात अशी ३.१३ लाख केंद्र कार्यरत आहेत.

 

यांना मिळणार लाभ

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे. घरकाम करणारी व्यक्ती, दुकानदार, चालक, मिड-डे मिल वर्कर, रिक्षाचालक, माथाडी कामगार, विडी उद्योगातील कामगार आदींचा यात सामावेश आहे.

 

काय आहेत पात्रतेच्या अटी

या योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्याला लाभार्थी होण्यासाठी दरमहा १५ हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असता कामा नये. जनधन खाते आणि आधार क्रमांक आवश्यक आहे. ज्यांचे वय १८ ते ४० या वर्षे इतके आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थी हा केंद्र सरकारच्या अन्य कोणत्या योजनेचा फायदा घेत असेल, तर त्याला लाभार्थी होता येणार नाही. या योजनेअंतर्गत काही रक्कम लाभार्थ्याला भरावी लागेल, सरकार त्याच्या खात्यात ही रक्कम जमा करेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@