चर्चचे नखरे पुन्हा सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2019
Total Views |



मुंबई : धार्मिक कार्य सोडून राजकीय, आर्थिक अशा सर्व बाबींत नको तेवढे लक्ष घालणाऱ्या, प्रसंगी देशाच्या सार्वभौम राज्यव्यवस्थेच्या विरोधात वक्तव्ये करणाऱ्या आणि गेल्या दीड-दोन वर्षांत विविध गैरप्रकार उघडकीस आल्याने अडचणींत सापडलेल्या भारतातील चर्चचे व त्यांच्या प्रमुख नेत्यांचे नखरे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळाने पॉक्सो अर्थात लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षणकायद्यात बदल करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी केलेल्या दुरूस्तीला चर्चने विरोध केला आहे.

 

काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी नुकतेच याबाबत वेगवेगळे वृत्त प्रसिद्ध केले आहे. युसीए न्यूज (युनियन ऑफ कॅथलिक एशियन) या कॅथलिक समाजाला वाहिलेल्या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने पॉक्सो कायद्यातील दुरूस्तीस दिलेल्या मान्यतेच्या निर्णयाला चर्चने विरोध केला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाला चर्च कधीही समर्थन देणार नाही, असे वक्तव्य चर्चकडून करण्यात आले आहे. बुधवार, दि. १० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॉक्सो कायद्यात दुरूस्ती करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या दुरूस्तीनुसार, बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडासह अनेक कडक शिक्षांची तरतूद करण्यात येणार असून यामुळे बालकांवरील अत्याचारांवर आळा घालण्यास मदत होणार आहे. परंतु, यातील मृत्युदंडाची तरतूद ख्रिश्चन नेत्यांना मान्य नाही. ‘चर्च मृत्यूदंडाच्या विरोधात आहे. मृत्यूदंड हा कोणत्याही गुन्ह्यावरील उपाय असू शकत नाही.असे वक्तव्य गुजरातमधील राजकोटचे बिशप जोस चित्तुपरमपील यांनी युसीए न्यूजला प्रतिक्रियेमध्ये केले आहे.

 

चर्चचा माणसाच्या परिवर्तनावर विश्वास आहे. आयुष्य ही परमेश्वराकडून मिळालेली भेट असून त्यामुळे मृत्यूदंडाचे कधीही समर्थन करता येणार नाही.अशीही पुस्ती बिशप चित्तुपरमपील यांनी जोडली आहे. याच प्रकारचे वक्तव्य मध्य प्रदेश कॅथलिक चर्चचे जनसंपर्क अधिकारी फादर मारिया स्टीफन यांनीही केले आहे. जीव घेणे नाही तर जीवाचे रक्षण करणे हे राज्यव्यवस्थेचे कर्तव्य आहे.असेही उपदेशामृत फादर स्टीफन यांनी सरकारला पाजले आहे. एकीकडे, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलत असताना, चर्चसारखी जबाबदार संस्था व त्यांचे धर्मगुरू सरकारलाच उलट उपदेश देताना दिसत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@