नवी दिल्ली : दुचाकी वाहन निर्माता कंपनी टीव्हीएसतर्फे देशातील पहीली इथेनॉलवर चालणारी अपाची आरटीआर २०० एफआय ई १०० बाजारात आणली आहे. या दुचाकीसाठी इथेनॉलची खरेदी कुठून करायची अशी चिंता ग्राहकांना होती. मात्र, देशभरातील पेट्रोल पंपांवर आता इथेनॉलच्या विक्रीसाठी पंप उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संकेत दिले. देशभरात आत्तापर्यंत एकही इथेनॉलच्या विक्रीचा पंप नाही.
टीव्हीएसने घोषणा केल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले होते. दोन वर्षांत दिल्लीसह देशभरातील शहरांमधील प्रदुषणाची समस्या नियंत्रणात आणण्यावर लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक बस, दुचाकी, रिक्षा, कार आदी वाहने इथेनॉलवर चालवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
पेट्रोलच्या वापरासह इथेनॉलवर भर देण्याच्या विचारात आहे. त्यासाठी केंद्रीय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहून इथेनॉल पंपांच्या स्थापनेसाठीची मागणी केली आहे. याची सुरुवात उस उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतून होणार आहे.
इथेनॉल एक पर्यावरणपूरक इंधन आहे. ऊसापासून त्याची निर्मिती केली जाते. ऊसाच्या कारखान्यात इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते. नॉन-टॉक्सिक, बायोडिग्रेडेबल आणि वाहतूकीसाठी सुरक्षित आहे. यात ऑक्सिजनचे प्रमाण ३५ टक्के असून वापर केल्यानंतर नायट्रोजन ऑक्साई उत्सर्जनही कमी होते. त्यामुळे पेट्रोलसह याचा वापर केल्यास पैसे आणि इंधनाची बचत होऊ शकते. बाजारात याची किंमत ५२ रुपये इतकी आहे. सरकारनेही पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलच्या मिश्रणाला मंजूरी दिली आहे.
ब्राझीलमध्ये होते १०० टक्के इथेनॉलवर आधारित वाहतूक
इथेनॉल वाहनांवर प्रयोग ब्राझीलमध्ये ४० वर्षांपूर्वी करण्यात आला. १९७९ पासून ब्राझीलमधील वाहन कंपन्या १० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करत आहे. ब्राझीलमध्ये सर्वाधिक वाहने इथेनॉल मिश्रित इंधनावर धावतात. भारतात इथेनॉलची बाजारपेठ ११ हजार कोटींची आहे. येत्या वर्षभरात ही उलाढाल २० हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat