आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा

12 Jul 2019 17:04:58


बॉलिवूडचे
शेहेनशाहा अमिताभ बच्चन आता एबी आणि सीडी या मराठी चित्रपटामधून प्रेक्षांसमोर येणार आहेत. त्यामुळे हा योगायोग म्हणावा की काय, तर आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.



बीग बी बरोबरच 'लई भारी' या चित्रपटातून विठ्ठलावरची भक्ती प्रतीत करणाऱ्या रितेश देशमुखने देखील सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.



कलेला भाषा नसते ही गोष्ट आपण बरेच वेळा ऐकत असतो. मात्र सध्या चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार ही गोष्ट खरी करून दाखवताना दिसत आहेत. बॉलिवूडचे काही लोकप्रिय कलाकार मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काही भरीव योगदान देत आहेत तर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडत आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0