बीएमसीचा निष्काळजीपणा उठला 'दिव्यांश'च्या जीवावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2019
Total Views |




नाल्यात पडलेल्या दिव्यांशचा सोळा तास उलटूनही लागला नाही शोध; नातेवाईकांचा संताप

 

मुंबई : घराबाहेर खेळत असताना अवघ्या तीन वर्षाचा चिमुरडा उघड्या नाल्यात पडल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवारी रात्री १०.२४ वाजता गोरेगाव येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकात ही घटना घडली. दिव्यांश असे या चिमुरड्याने नाव असून सोळा तास उलटूनही त्याचा शोध न लागल्याने स्थानिकांचा संतापाचा पारा चढला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांश हा बुधवारी रात्री १०.२४च्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर आला होता. यावेळी तो परत घराकडे निघाल्यानंतर घराशेजारी असलेल्या उघड्या नाल्यात त्याचा तोल गेला. काही मिनिटानंतर त्याची आई त्याला शोधायला आल्यानंतर दिव्यांश आजूबाजूला न दिसल्याने आरडाओरड सुरू केली. यावेळी काहींनी शेजारी असलेला सीसीटीव्ही तपासाला असता दिव्यांश या उघड्या नाल्यात पडला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाने दिव्यांशचा तपास सुरू केला असून सोळा तास झाले तरी तपासाला यश आले नाही.

 

याआधीही २०१७ साली सुप्रसिद्ध डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोल मध्ये पडून मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये कुर्ला येथे दिनेश जठोलिया नावाचा राजस्थानी युवक मॅनहोलमध्ये पडून मरण पावला होता. दरम्यान, या दुर्घटनेला मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा सर्वस्वी जबाबदार असून पालिकेच्या भोंगळ्या कारभाराचा आणखी एक बळी गेला असल्याची स्थानिकांची भावना आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@