अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

03 Jun 2019 14:16:41



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू अजित डोवाल यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. यासोबतच त्यांना भारत सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये बहुमुल्य योगदान दिल्याने मोदी सरकारने हा दर्जा बहाल केल्याचे बोलले जाते. पुढील पाच वर्षांसाठी त्यांची ही नेमणूक असणार असून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जाही पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.

 

७४ वर्षीय अजित डोवाल एक मुसद्दी म्हणून ओळखले जातात. १९६८ पासून आजपर्यंत त्यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. चीन सोबतचा डोकलाम विवाद किंवा पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती यावेळी त्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिवाय सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवेळीही त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0