स्पाईसजेटचा फुटला टायर ; १८९ प्रवासी सुखरूप

12 Jun 2019 13:40:35



जयपूर : स्पाईसजेटच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपायचे नाव घेत नाही आहे. बुधवारी सकाळी जयपूर विमानतळावर स्पाईसजेटच्या एसजी-५८ या विमानाची एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आली. विमानाचा टायर फुटल्याने जयपूर विमानतळावर विमान उतरवत इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले. या विमानातील सर्व १८९ प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

जयपूर विमानतळावर बुधवारी सलग चौथ्या दिवशी चार उड्डाणे रद्द झाली. गेल्या चार दिवसांत एकूण १६ विमाने रद्द झालीत. सूत्रांच्या माहितीनुसार, एअरलाईन्सकडे गेल्या काही दिवसांपासून क्रू मेम्बर्सची संख्या कमी आहे. त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून विमानांच्या उड्डाणावरही होत आहे. यामुळे जवळपास ८०० प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0