नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या उच्च आयुक्त हरिंदर सिद्धू यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेचे कौतुक केले. सिद्धू या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उच्च आयुक्त आहेत. भारतात विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना एका परदेशी उच्च आयुक्ताने ईव्हीएमचे कौतूक केलेले महत्वाचे मानले जात आहे. यावेळी सिद्धू यांनी निवडणूक आयोगाचेही कौतुक केले.
भारतातील निवडणुका या आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात मतदान करण्याची व्यवस्था कशी काय होऊ शकते? याचे फक्त एकही उत्तर आहे, ते म्हणजे नियोजन आणि हे निवडणूक आयोग व आयोगाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. भारतीय निवणूक आयोग ही खूप व्यवस्थित संस्था असल्याचे सिद्धू म्हणाल्या.
यावेळी त्यांनी व्हीव्हीपॅट यंत्रणेचे कौतुक करताना म्हटले की, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेने मला खूप प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर होतो. या मतपत्रिकेवरही लोकांना विश्वास नसून याच्या विश्वासहार्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat