महारांगोळीतून रेखाटली आपले सण आपली संस्कृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



नाशिक : राष्ट्रीय विकास मंडळ संचालित नववर्ष यात्रा स्वागत समितीच्या माध्यमातून येथील गोदाघाटावरील पाडवा पटांगण येथे महारांगोळी साकारण्यात आली. ‘आपले सण, आपली संस्कृती’ या विषयावर रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीच्या रेखाटनकामी सुमारे १० टन रंग व रांगोळी यांचा वापर करण्यात आला. ही महारांगोळी रेखाटण्याकरिता सुमारे ५०० महिलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

रांगोळी ही, स्थिती-लय या संकल्पनेची प्रतिकृती असल्याने उत्पत्ती, स्थिती, लय या संकल्पनेचे प्रतीक म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या प्रतिकृती, आकाशकंदील, दहीहंडी व गुढी आदी सणांचे चित्र यात रेखाटण्यात आले होते. या रांगोळीच्या बाह्य आकारातील सप्तरंग हे जीवनातील आनंद वृद्धिंगत करण्याचे प्रतीक म्हणून साकारण्यात आले होते. तसेच, या रांगोळीच्या माध्यमातून विविध रंगांद्वारे भारतीय सण, उत्सव आणि संस्कृती यांचा बोलका संदेश देण्यात आला आहे. यातील बाहेरील तीन मोठ्या वर्तुळांच्या माध्यमातून त्रिदोष साकारण्यात आले आहेत, तर रांगोळीतील भगवा रंग हा त्याग व सहिष्णुता यांचे प्रतीक म्हणून वापरण्यात आला आहे. या रांगोळीत श्रीयंत्र, चार आश्रम, दानाचे महत्त्व विशद करण्यासाठी अर्घ्यदान, महिलांचा आपल्या संस्कृतीत असणारा स्नेहभाव दर्शविणारे चित्र, जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणेे व मतदान जागृती करणारे आरेखनदेखील या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आले होतेयावेळी रांगोळीच्या बिंदूंचा मान हुतात्मा जवान यांच्या पत्नी व माता यांना देण्यात आला.


रांगोळीच्या उद्घाटनप्रसंगी अपर्णा रामतीर्थकर
, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या सिनेट सदस्य रुपाली खैरे, योगविद्या धामच्या प्रमुख पौर्णिमा मंडलिक, समाजसेविका वृंदा लवाटे यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अपर्णा रामतीर्थकर म्हणाल्या की, ”सदरची महारांगोळी रेखाटण्यात सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार निलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा अष्टेकर, भारती सोनवणे, विना गायधनी यांच्यासह ५०० महिलांनी सहभाग नोंदविला होता. हिंदू धर्मात आणि भारतात जन्मास येणे हे भाग्याचे लक्षण आहे. भारताची भावी पिढी धर्म आणि संस्कार यापासून दूर जाऊ नये यासाठी पालकांनी मोठी जबाबदारी निभावणे आवश्यक आहे. त्भारतीय समाज हा भूतदया, भक्ती आणि भाव यांची जोपासना करणारा असल्याने आपण आपले सण उत्सव हे त्याच भावनेने साजरे करावयास हवे.” यावेळी त्यांनी भारतीय सण साज शृंगार यांचे वैज्ञानिक दृष्टीने असणारे महत्व त्यांनी यावेळी विषद केले. तसेच गुढीपाडव्याचेही महत्व विषद केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@