पराभव दिसू लागल्यानेच ईव्हीएमवर खापर : नरेंद्र मोदी

24 Apr 2019 14:22:55



नवी दिल्ली : विरोधक आधी माझ्यावर टीका करत होते. मात्र, कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःचा पराभव समोर दिसू लागल्याने त्याचा दोष ईव्हीएम मशीनला देण्याचे त्यांनी ठरवले आहे. परिक्षेत जसे काही विद्यार्थी एखादा पेपर चांगला न गेल्यास पेन चालत नव्हता, असे उत्तर देतात तसेच आता विरोधकही ईव्हीएमचे कारण पुढे करत असल्याची टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली.

 

लोकसभा निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. तसतशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगतही वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना करत आहेत. मंगळवारी चंद्रबाबू नायडू आणि शरद पवार यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असा आरोप केला होता. त्याला आज नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

झारखंडच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वीही असेच हल्ले भारतात होत असल्याचे म्हटले. 'श्रीलंकेत दहशतवाद्यांनी चर्च आणि इतर ठिकाणी कशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला हे तुम्ही बघितले आहे. २०१४ च्या लोकसभेपूर्वी देशातही तशीच स्थिती होती, असे मोदी म्हणाले.

 

नरेंद्र मोदी म्हणाले, "काँग्रेसची ही भूमिका दुटप्पीपणाची आहे. शेतमालाला हमीभाव न देणाऱ्या दलालांना मात्र काँग्रेसने कायमच संरक्षण दिले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने शेतकरी व ग्राहक या दोघांचा विचार करून त्यांच्या आड येणाऱ्या दलालांचा बिमोड केला आहे."


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0