मतदार नोंदणी मोहिमेला यश; २ हजार केंद्रे वाढली

02 Apr 2019 18:04:38



मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्र असणार आहेत. राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र वाढविण्यात आली असल्याने यंदा मतदार केंद्राची संख्या वाढली. यात सर्वाधिक नाशिकमध्ये २७४, पुण्यामध्ये २३७ आणि ठाण्यामध्ये २२७ मतदान केंद्र वाढली आहेत. तर सिंधुदुर्गमध्ये एकही मतदान केंद्र वाढले नाही.

 

साधारणपणे १ हजार ४०० मतदारांमागे १ मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसात मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रांचीही वाढ करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी ९५ हजार ४७३ मतदान केंद्र स्थापन करण्याचे नियोजन होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0