जेष्ठ समाजसेविका ज्योती पाटकर यांचे निधन

15 Apr 2019 16:48:04




डोंबिवली : जेष्ठ समाजसेविका तसेच भाजपच्या माजी कल्याण जिल्हा सरचिटणीस ज्योती पाटकर यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.

 

परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलाच्या प्रश्नासंदर्भात त्या काम पाहत होत्या. महिलांना शिक्षणासाठी जागृत करणण्याचे काम त्यांनी परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून केले. जेष्ठ नागरीकासाठी त्यांनी विरंगुळा केंद्र सुरू केले. डोंबिवली पूर्वेतील रामनगर येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

पाटकर यानी स्वयंसिद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. तर नेत्रदिप बालवाडीचे काम, झोपडपट्टीवासीयांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. डोंबिवली साहित्य सभेच्या सदस्या, राजकीय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कार्यकर्त्या म्हणून त्याचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक व राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0