महायुतीचा दणदणीत भव्य कार्यकर्ता मेळावा

01 Apr 2019 14:20:02



ठाणे : "देशात लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मोठी लाट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात एनडीएचे सरकार येणार हे निश्चित आहे. मात्र, यात महाराष्ट्र राज्य पुढे राहिले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती किमान ४२ ते ४५ जागा जिंकू शकते. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बाजूने वातावरण असून येथून विक्रमी मताधिक्याने खासदार राजन विचारे यांना विजयी करण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागावे," असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले. सध्याचे वातावरण पाहिले तर ठाणे मतदारसंघात महायुतीचा विजय तीन लाखांच्या मताधैक्याने होईल, असा विश्वास आ. प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे विद्यमान खासदार व लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी संपर्क प्रमुख तथा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीचा पहिला भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. ३० मार्च रोजी सायंकाळी मिरारोड येथे हा मेळावा पार पडला. महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यानी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांच्या विजयासाठी एकदिलाने कामाला लागण्याचा निर्धार केला.

 

यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे , राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, उमेदवार खासदार राजन विचारे, शिवसेना मीरा भाईंदर संपर्क प्रमुख व आमदार प्रताप सरनाईक, मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता , महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा, रिपाइंचे देवेंद्र शेलेकर , भाजपचे जिल्हा अध्यक्ष हेमंत म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते राजू भोईर व महायुतीचे प्रमुख नेते ,पदाधिकारी उपस्थित होते.

 

मेळाव्याचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले की, "प्रत्येक ठिकाणी काही मतभेद किंवा वाद विवाद होत राहतात. पण आता आम्ही सर्व वाद विसरून मीरा भाईंदरच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण सर्व जुने वाद विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. २०१४ मध्ये राजन विचारे हे दोन लाख ८० हजार मतांच्या फरकाने जिंकले होते. त्यात बेलापूर २५ हजार, ऐरोली २० हजार, कोपरी पाचपाखाडी ६८ हजार, ठाणे ६६ हजार, ओवळा माजीवडा ५८ हजार, मीरा भाईंदर ४२ हजार अशी विधानसभा मतदार संघनिहाय मतांची आघाडी विचारे यांना मिळाली होती. आताही तीच स्थिती असून यावेळीही देशात मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोक स्वतःहून मतदान करतील आणि केंद्रात पुन्हा मोदी हेच पंतप्रधान बनतील, राजन विचारे हे दुसऱ्यांदा लाख मतांच्या फरकाने विजयी होऊन खासदार बनतील."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



Powered By Sangraha 9.0