२४ तासांत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

22 Mar 2019 10:11:10


जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांत दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात एकूण चार चकमकी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेच्या सुमारास पुन्हा शोपियान जिल्ह्यातील इमाम साहबमध्ये चकमक सुरू झाली. या ठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपले आहेत.

बांदीपोरा या ठिकाणी झालेल्या चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा'चे दोन दहशतवादी ठार झाले. बारामुला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते. २४ तासात चार चकमकी झाल्या असून आतापर्यंत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आह. चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले आहेत.


दहशतवादी अली भाई हा पाकिस्तानचा असल्याचे बोलले जात आहे. बारामुलाच्या कलंतरा परिसरात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती श्रीनगर येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल कालिया यांनी दिली आहे. चकमकीदरम्यान जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बारामुलात दहशतवाद्यांनी होळीच्या दिवशी शोधमोहीम सुरू असताना जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर काही मिनिटांच्या आत सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. परंतु, या ठिकाणी एकही भारतीय जवान जखमी झाला नाही, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0