'एनएमएमटी'च्या प्रवाशांचा प्रवास होणार 'कॅशलेस'

12 Mar 2019 17:47:43


 


मुंबई : 'एनएमएमटी' (नवी मुंबई महानगर परिवहन)मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. भारतातील अग्रणी मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेली रिडलर कंपनीने "नवी कार्ड" - रुपे राष्ट्रीय कॉमन मॉबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे 'एनएमएमटी'च्या दररोज निर्माण होणाऱ्या सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार आहे.

 

एनएमएमटी आणि एचडीएफसी बँक सोबत ही भागीदारी असणार आहे. या ओपन लूप स्मार्ट कार्डमुळे प्रवाशी एनएमएमटी बसमध्ये कॅशलेस व्यवहार करू शकतात. याशिवाय रुपे कार्ड स्वीकारणाऱ्या किरकोळ दुकानांमधील खरेदीसाठीदेखील प्रवासी हे कार्ड वापरू शकणार आहेत. भारत सरकारच्या एक राष्ट्र एक कार्डया कार्यक्रमाला समोर ठेऊन या कार्डची निर्मिती केली आहे.

 

यावेळी एनएमएमटीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर शिरीष अरडवाड म्हणाले, "एनएमएमटी आणि रिडलरने एकत्रितपणे भारतातील बससाठी प्रथमच मोबाईल टिकिटिंग पर्याय आणला आहे. हीच भागीदारी पुढे नेऊन, मुंबईतील प्रवाशांसाठी एनसीएमसी आधारित 'नवी कार्ड' आधारित टिकीटिंग, प्रत्यक्षात आणण्यासाठी रिडलरने आमच्याबरोबर काम केले आहे. ही अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही भारतातील पहिल्या काही एजन्सींपैकी एक आहोत. स्मार्ट कार्ड लॉन्च यशस्वी होण्यामध्ये रिडलर संघाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे."

 

रिडलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिजराज वाघानी म्हणाले, "मोबाईल टिकीटिंग समाधानाची नुकतीच यशस्वीपणे सुरूवात केल्यानंतर, नवी कार्डच्या लॉंचसाठी एनएमएमटीसह भागीदार बनून आम्ही उत्साहित आहोत. स्मार्ट कार्डची रचना मुंबईकरांची सोय लक्षात घेवून केलेली आहे, ज्यामुळे ते त्यांच्या मोबिलिटीच्या गरजा भागविण्याशिवाय इतरत्रदेखील वापरू शकतात. एनएमएमटीचा हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0