अमेरिका ओसामाच्या मुलाच्या शोधात

01 Mar 2019 12:27:40


 


नवी दिल्ली : अमेरिकेने दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला होता. मात्र, आता त्याच्यानंतर त्याचा मुलगा हामजा बिन लादेन सक्रिय झाल्याचे समोर येत आहे. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. "ओसामाला मारल्यानंतर त्याचा मुलगा आता अल-कायदा या दहशतवादी संघटनेत सक्रिय झाला आहे. त्यामुळे हामजा याची माहिती देणाऱ्या देशास १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस अमेरिका प्रशासन जाहीर करत आहे." असे अमेरिकेने सांगितले.

 

"हामजा बिन लादेन हा ओसामाच्या अल-कायदा संघटनेत सक्रीय झाला असून तो जिहादींचा नेता आहे. त्याने दहशतवाद्यांचे जाळेही उभारण्यास सुरुवात केली आहे. तो अमेरिकेवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी आमच्याकडून दक्षता घेतली जात आहे. याआधीच हामजाला अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे घोषित करण्यात आले आहे. सद्या त्याचे वास्तव्य अफगानिस्तान-पाकिस्तान सीमेवर किंवा इराणमध्ये असू शकते." असे अमेरिकेचे सुरक्षा अधिकारी मायकल टी. इवानॉफ यांनी सांगितले आहे.

 

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने अबोटाबादमध्ये ठार केले होते. ओसामा बिन लादेनने अमेरिकेतल्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' या ट्विन टॉवरवर ११ सप्टेंबर २००१ला विमान हल्ला केला होता. ज्या घटनेत अडीच हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर अमेरिकेकडून ओसामाला पाकिस्तानमध्ये घुसून ठार करण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0