न्यूझीलंडने भारताला आणले जेरीस

06 Feb 2019 14:33:17




वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. न्यूझीलंडने तडाखेबाज सुरुवात करत ५व्या षटकामध्येच ५० धाव पार केल्या होत्या. त्यानंतर अवघ्या ४४ चेंडूंमध्ये ८६ धावांची भागीदारी रचून कॉलिन मुनरो आणि टीम सेफर्ट यांनी संघाला चांगली सुरुवात केली.

 

मुनरो आक्रमक फटका मारण्याच्या नादत ३० धावा काढून क्रृणालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर, सेफर्टने ३० चेंडू ५० धावा केल्या, त्यामध्ये ३ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार विलियम्सननेही फटकेबाजी करत २२ चेंडूंमध्ये ३४ धावांची खेळी केली. २० षटकांमध्ये न्यूझीलंडने ६ विकेटमध्ये २१९ अशी खेळी केली. भारताला विजयासाठी २२० धावांची गरज आहे. भाराकडून हार्दिक पांड्याने २ विकेट तर, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0