आनंद तेलतुंबडेची अटक १२ फेब्रुवारीपर्यंत टळली

05 Feb 2019 13:46:47


मुंबई : नक्षलवाद्यांच्या संबंधांच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडेच्या अंतरिम जामीनावरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत अटकही टळल्याने त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी सुरू झाल्यावर सरकारी वकीलांनी डॉ. तेलतुंबडे याला मिळालेल्या जामीनावर हरकत नोंदवली. या प्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. न्यायालयाने यानंतर सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. 

प्रकरण नेमके काय ?

नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून डॉ. आनंद तेलतुंबडे याला २ फेब्रुवारी रोजी पुणे पोलीसांनी अटक केली होती. पहाटे साडेतीन वाजता त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. विलेपार्ले पोलीस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर १ फेब्रुवारीला पुणे न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

 

अटक टाळण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. पुणे सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याला २ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले होते.

 

गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या आणि त्यांच्याशी विविध कार्यकर्त्यांशी संबंध आहेत, असा आरोप ठेवत पुणे पोलीसांनी ही कारवाई केली होती. यात काही सामाजिक कार्यकर्त्यांची अटक झाली होती. त्यात तेलतुंबडेचाही सामावेश होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/



 
Powered By Sangraha 9.0