ओडिशा : भारताचे एअर स्ट्राईकची यशस्वी कामगिरीची जगभर चर्चा चालू असताना संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीओने आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. क्विक रिअॅक्शन सर्फेस-टू-एअर मिसाइल म्हणजे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी डीआरडीओने ओडिशाच्या किनारपट्टीवरून घेतली आहे. भारतीय सेनेसाठी हे खास क्षेपणास्त्र बनवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डीआरडीओने चाचणी घेतलेले क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. हे क्षेपणास्त्र ३० किमी अंतरापर्यंत यशस्वी मारा करू शकते. या क्षेपणास्रच्या चार यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी दोन चाचण्या २०१७ मध्येच झाल्या होत्या. तर मंगळवारी एकाच दिवशी या क्षेपणास्त्राच्या दोन यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. डीआरडीओच्या या कागमिरीचे देशभरातून कौतुक होत असून यामुळे नक्कीच शत्रूच्या मनात धडकी भरणार आहे.
माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा...facebook.com/MahaMTB/आणिफॉलो कराtwitter.com/MTarunBharat