'क्रोकोडाइल हंटर’ला गुगलची मानवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2019
Total Views |



 

नवी दिल्ली : गुगलने शुक्रवारी खास डुडल तयार करत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांना मानवंदना दिली आहे. इरविन यांचा २२ फेब्रुवारी २०१९ रोजी ५७ वा जन्मदिन आहे. स्टीव्ह इरविन यांची 'क्रोकोडाइल हंटर' अशी ओळख आहे.

 
 

जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या कौशल्यामुळे स्टीव्ह लोकप्रिय होते. प्राण्यांशी त्यांची विशेष मैत्री होती. १५ नोव्हेंबर हा दिवस 'स्टीव्ह इरविन डे' त्यांना सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. स्टीव्ह हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-कीपर म्हणूनही कार्यरत होते. गुगलच्या डुडलमधून त्यांचे प्राणीप्रेम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 
 

इरविन यांचा जन्म मेलबर्नच्या एसिडोनमध्ये २२ फेब्रुवारी १९६२ मध्ये झाला. वडील वन्यजीव तज्ज्ञ असल्याने त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी संबंधित हर्पेटोलॉजी विषयात लहानपणापासून रुची जडली. डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक टीव्ही आदी वाहिन्यांवर त्यांचे विषेश कार्यक्रम प्रसारित केले जात. मगरींशी संबंधित 'क्रोको फाइल्स', 'द क्रोकोडाइल हंटर डायरीज' आणि 'न्यू ब्रीड वेट्स' आदी वाइल्डलाइफ डॉक्युमेंट्री प्रसिद्ध आहेत.

 
 
 

मगरींना पकडणाऱ्या या पशूप्रेमीचा अंत असा झाला

इरविन यांच्या मगरींविषयी प्रेमामुळे त्यांची क्रोकोडाइल हंटरअशी ओळख बनली. अनेक वन्यजीव, पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध त्यांनी लावला. द क्रोकोडाइल हंटरहा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होता. २००६मध्ये समुद्रातील जीवांवर आधारित पाण्याखाली चित्रिकरणादरम्यान स्टिंग-रे या माशाने दंश केल्याने स्टीव्ह इरविन यांचा मृत्यू झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@