सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

21 Feb 2019 12:29:53

 

 
 
 
 
मुंबई : बॉलिवुडमधील सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकुमार बडजात्या हे राजश्री प्रोडक्शन्सचे मालक होते. फिल्म मेकर सूरज बडजात्या यांचे ते वडील होते.
 
 
 
 

हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. राजकुमार बडजात्या यांच्या निधनामुळे हिंदी सिनेसृष्टीत शोककुळ वातावरण निर्माण झाले आहे. हम आपके है कौन, मैने प्यार किया यासांरखे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी बॉलिवुडला दिले. अलीकडच्या काळातील प्रेम रतन धन पायो या सिनेमाची त्यांनी निर्मिती केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0