आयपॅडवर बारावीची परिक्षा देण्यास विद्यार्थिनीला परवानगी

20 Feb 2019 18:45:57

 

 
 
 
मुंबई : महाराष्ट्रात २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परिक्षा सुरु होणार आहे. मुंबईतील सोफिया महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला आयपॅडवर परिक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक बोर्डाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. निशका हसनगडी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही विद्यार्थिनी दिव्यांग असल्याने तिला ही परवानगी देण्यात आली आहे. 
 

बालपणीपासून निशकाला हातात पेन किंवा पेन्सिल धरून लिहिता येत नाही. त्यामुळे निशकाला आयपॅडवर बारावीची परिक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती. शिक्षण बोर्डाने ही मागणी पूर्ण केली असून निशकाला परिक्षेच्यावेळी एक लेखनीक देण्यात येणार आहे. हा लेखनीक निशकाने आयपॅडवर लिहिलेले उत्तर उत्तर पत्रिकेवर लिहणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0