ऐतिहासिक! ‘ना जात, ना धर्म’ प्रमाणपत्र मिळविणारी पहिली भारतीय

18 Feb 2019 17:13:50

 

 
 
 
 
तिरूपत्तूर : ‘ना जात, ना धर्म’ असे प्रमाणपत्र एका महिलेने मिळविले आहे. स्नेहा असे या महिलेचे नाव असून असे प्रमाणपत्र मिळविणारी ही पहिली भारतीय महिला आहे. देशात पहिल्यांदाच ही घटना घडली आहे. स्नेहा व्यवसायाने एक वकील आहे. ‘नो कास्ट, नो रिलीजन’ असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी स्नेहाने ९ वर्षे संघर्ष केला. यासाठी स्नेहाला सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या.
 

स्नेहा ही तामिळनाडू राज्यातील वेल्लूरमधील तिरूपत्तूर येथील रहिवासी आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे स्नेहावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही अनेक यूजर्सकडून स्नेहाच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. स्नेहाचे आईवडील सर्व कागदपत्रांवर जाती आणि धर्माचा कॉलम रिकामा सोडत असत. स्नेहा हे बालपणीपासून पाहत आली होती. स्नेहानेदेखील आईवडीलांचे अनुकरण केले. या प्रमाणपत्राविषयी स्नेहाने सांगितले की, मी स्वत:ला एक भारतीय मानते. मी आजपर्यंत कधीच स्वत:ला जात आणि धर्मामध्ये बांधून घेतले नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असते, हे मला जाणवले. मला हे प्रमाणपत्र मिळवायचे होते. कोणत्याही जातीशी तसेच धर्माशी माझा संबंध नसल्याचे मला सिद्ध करता येत होते.

 

स्नेहाने २०१० साली ना जात ना धर्मया प्रमाणपत्रासाठी मी अर्ज केला होता. २०१९ मध्ये स्नेहाला हे प्रमाणपत्र मिळाले. या ९ वर्षात स्नेहाला मोठा संघर्ष करावा लागला. ‘नो कास्ट, नो रिलीजन’ असे प्रमाणपत्र मिळविणारी स्नेहा ही देशातील पहिली व्यक्ती आहे. तिरूपत्तूरचे उपजिल्हाधिकारी बी. प्रियंका पंकजम यांनी स्नेहाच्या भावना समजून घेत तिला हे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. स्नेहाला तीन मुली आहेत. स्नेहा आपल्या तिन्ही मुलींच्या अर्जामध्येदेखील धर्म आणि जातीचा कॉलम रिकामा सोडते. ‘ना जात, ना धर्म’ हे प्रमाणपत्र मिळवून स्नेहाने जातीयवादाविरूद्ध कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0