रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत!

17 Feb 2019 19:01:32

 

 
 
 
 
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. अभिनेते रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी ‘रजनी मक्कल मन्दरम’ या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. परंतु २०१९ ची लोकसभा निवडणूक रजनीकांत यांचा पक्ष लढवणार नाही. असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही अधिकृत घोषणा केली.
 

या लोकसभा निवडणुकीमध्ये माझा व माझ्या पक्षाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसेल. असे ते म्हणाले. त्यांच्या रजनी मक्कल मन्दरम या पक्षाच्या चिन्हांचा, झेंड्यांचा आणि फलकांचा वापर इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी करू नये. असा सल्ला रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसून तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूकीवर आपले लक्ष असेल. असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनीकांत यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 

 
Powered By Sangraha 9.0