पाकला झटका; डर्टी मनी ब्लॅकलिस्टमध्ये समावेश

16 Feb 2019 16:00:33



पुलवामा हल्ल्यानंतर पाकला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा युरोपियन युनियनचा निर्णय

 

नवी दिल्ली : पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जगभरातून निषेध होत आहे. भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानंतर आता युरोपियन युनियनने पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुलमावा येथील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर युरोपियन युनियनने हा निर्णय घेतला. युरोपियन युनियनच्या डर्टी मनी ब्लॅकलिस्ट नेशनमध्ये पाकिस्तानचा समावेश केल्याची माहिती युरोपियन युनियनने दिली आहे.

 

फसवेगिरी करणे, मनी लॉन्ड्रिंग, अतिरेक्यांना आर्थिक मदत करणे या आरोपाखाली युरोपियन युनियनने पाकिस्तानसह ९ देशांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. युरोपियन युनियनने ब्लॅकलिस्ट केलेल्या देशांची संख्या आता २३ झाली असून युरोपियन युनियन या देशांशी असलेले सर्वप्रकारचे आर्थिक संबंध तोडून टाकते. युरोपियन युनियनमध्ये सध्या २८ देश आहेत. दरम्यान, पाकिस्तानला डर्टी मनी ब्लॅकलिस्ट नेशनमध्ये टाकल्याचा काही देशांनी विरोध दर्शविला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0