आता बदला निश्चित; सुरक्षा समितीची बैठक

15 Feb 2019 10:12:10
 

नवी दिल्ली : पुलवामा आत्मघाती दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेविषयी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीसीएस) बैठक बोलावली आहे. बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. सकाळी ९.३० वाजता ही बैठक सुरू झाली. ५५ मिनिटे सुरू असलेल्या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले त्याबद्दल अद्याप वृत्त हाती आलेले नाही. मात्र, हल्ल्याविरोधात कठोर पावले उचचली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 

ही अतिशय महत्वाची बैठक यात जम्मू काश्मीर आणि देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक सुरू आहे. यावेळई राजनाथ सिंह, निर्मला सितारमन, पियूष गोयल, सुषमा स्वराज, अजित डोवाल आणि इतरही वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित आहेत. 

 
 
 

या हल्ल्यातील शहिदांचा आकडा वाढून ४३ वर पोहोचला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे १२ सदस्य या घटनेचा तपास करण्यासाठी जम्मू-काश्मीरात जाणार आहेत. गुरुवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास आत्मघातकी हल्ला झाला. आधी आयईडी स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले दोन दिवसांचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. या प्रकरणी देशभरातून दहशतवादाविरोधात तीव्र भावना आहेत.

आम्हाला देशाच्या नेतृत्तवावर पूर्ण विश्वास आहे. घाईगडबडीत कोणतेही पाऊल उचलण्यापेक्षा योग्यवेळी योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. शहिद झालेल्या जवानांबद्दल आमच्या सद्भावना आहेत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही.

- संरक्षण राज्यमंत्री व्हि.के. सिंह

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0