हिरक महोत्सव : पाच हजार विद्यार्थ्यांचा सुर्यनमस्कार

12 Feb 2019 17:06:59


अंबरनाथ : जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त चार हजार विद्यार्थ्यांनी घातलेल्या पाच हजार सामुदायिक सूर्यनमस्काराच्या साक्षीने बदलापूरच्या आदर्श शिक्षण संस्थेचे पटांगण फुलून गेले होते. या निमित्ताने हिरक महोत्सवी वर्षाची शानदार सुरुवात करण्यात आली.

 

बदलापूरच्या विकासात शैक्षणिक योगदान देणाऱ्या आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त रथसप्तमी व जागतिक सुर्यनमस्कारदिनाचे औचित्य साधत आदर्श शिक्षण संस्था आणि श्री अंबिका योग निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

 

शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात शाळेतील तिसरी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिस्तमय रीतीने सूर्यनमस्कार घातले. त्यापूर्वी प्रकाश कासार आणि ए. व्ही. भालेराव यांनी सूर्यनमस्कार आणि योगाचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. सध्याच्या ताण तणाव आणि स्पर्धेच्या युगात दैनंदिन व्यायाम हाच उत्तम पर्याय सांगितले.

 

सूर्यनमस्कारासाठी शाळेमध्ये गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून सर्व करून घेण्यात आल्याचे रमेश बुटेरे यांनी सांगितले. संस्थेचे माजी अध्यक्ष तुषार आपटे यांनी देखील विद्यार्थ्यांसमवेत सूर्यनमस्कार घातले. माजी अध्यक्ष तुषार आपटे, रघुनाथ पाटील, संजय गायकवाड, पंढरीनाथ बाविस्कर, दत्तात्रय कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यपिका रश्मी देशपांडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दफतरदार, शाळेची माजी विद्यार्थिनी आणि अभिनेत्री अश्विनी कासार तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0