नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

02 Dec 2019 19:26:29


safasf_1  H x W


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा प्रकोप सुरुच असून सोमवारी नक्षलवाद्यांनी दोघा निष्पाप नागरिकांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. मासो ढेबला पुंगाटी (५५) आणि ऋषी लालु मेश्राम (५२) अशी दोघा नागरिकांची नावे असून हे दोघेही मौजा पुरसलगोंदी येथील रहिवासी असल्याचे समजते.

 

मासो पुंगाटी हे पोलीस पाटील असल्याबाबतची माहिती काही वृत्तपत्र आणि वृत्तसंकेतस्थळांवर प्रसिद्ध झाली होती. ही माहिती पूर्णत: चुकीची असुन मासो पुंगाटी हे पोलीस पाटील नसून नक्षल समर्थक असल्याबाबतची पोलीस दप्तरी नोंद आहे. सोमवारी दोघेही सुरजागड येथे खाणकामावर जात असल्याचा राग मनात धरून नक्षलवाद्यांनी दोघांचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Powered By Sangraha 9.0