‘भटकंती कट्टा ठाणे’चे चौथे पर्व एका जग फिरणाऱ्या भटक्यासोबत!

18 Dec 2019 14:07:16

vv_1  H x W: 0



ठाणे : भटकंती हा गाभा ठेवून महिन्यातून एकदा ठाण्यात भटक्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ज्ञानसंवर्धन आणि तज्ञ व्यक्तींकडील उपलब्ध माहितीचा प्रसार व्हावा या एकमेव हेतूने, भटक्यांकडून भटक्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. पहिला कट्टा ठाण्याचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व पटवून देणार ठरला या कट्ट्याला विनायक परब यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या कट्ट्याचा विषय ठाण्याच्या जवळचा पण थोडा अपरिचित असणारा म्हणजे कांदळवन यावर झाला. डॉ. शीतल पाचपांडे ह्यांनी याविषयी मार्गदर्शन केले. तिसरा कट्टा प्रसिध्द दुर्गअभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी विरगळ विषयी मार्गदर्शन केले. यावेळी या कट्ट्यावर विशेष उपस्थिती असणार आहे ती विष्णुदास चापके यांची. जग फिरलेला हा भटकंतीप्रेमी या वेळी आपल्या कट्ट्याला त्यांचे अनुभव सांगणार आहे.


महाराष्ट्रातील मराठवाडा येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि व्यवसायाने पत्रकार असणारे विष्णुदास चापके
यांची विष्णु द गामानावाने आज ओळख निर्माण झाली आहे. भारतीय नौदलाच्या कमांडरंपासून प्रेरित होऊन त्यांनी तीन वर्षांत जगातील पाच खंड आणि सुमारे ३५ देशांना भेटी दिल्या आहेत. या दरम्यान त्यांनी आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांचा दौरा केला.


भटकंती कट्टा ठाणेगुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० रोजी राजेंद्र पाटील मंगला हायस्कूल, कोपरी, ठाणे (पूर्व), ठाणे ४००६०३ येथे होणार असून, सगळ्यांसाठी प्रवेश खुला आणि विनामूल्य असणार आहे. अश्या नाव नवीन भटकंती बाबतचे विषय दर महिन्यातून एकदा भटकंती कट्टा ठाणे मार्फत आयोजित केला जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0