प्रतिष्ठीत अशा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमधून झोया अख्तर दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट बाहेर पडला आहे. ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी भारताकडून ‘गली बॉय’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. परंतु अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सने सोमवारी जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांमधील चित्रपटांच्या यादीमध्ये ‘गली बॉय’ला स्थान मिळालेले नाही. गली बॉय आता या शर्यतीमधून बाहेर पडल्यामुळे पुन्हा भारतीय प्रेक्षक आणि चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.