भारतीय जवानाचे वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण

28 Nov 2019 16:12:18



नवी दिल्ली : भारतीय लष्करातील हवालदार अनुज कुमार तेलियान यांनी ११व्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०१९मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. बंगळुरूचे असलेले अनुज कुमार यांचे मद्रास इंजीनिअर्स ग्रुपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. अनुज यांनी वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपच्या १००+ किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली आहे. अनुज कुमार भारतीय लष्करात मद्रास इंजीनिअर ग्रुपचे सदस्य आहेत.

 

११ व्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०१९ चो आयोजन दक्षिण कोरियात करण्यात आले होते. येथील जूजू बेटावर ५ ते ११ नोव्हेंबर रोजी ही चॅम्पियनशिप रंगली होती. यामध्येच भारताचे चित्रेश नटसन यांना मिस्टर यूनिवर्स २०१९चा खिताब देण्यात आला आहे. यासोबतच, भारताच्या बॉडी बिल्डर्सने वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अॅन्ड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या टीम कॅटेगिरीमध्ये सुद्धा विशेष कामगिरी करत दुसरे क्रमांक पटकावले आहे.

Powered By Sangraha 9.0