काश्मीरमध्ये जाण्यास कॉंग्रेसला कुणी रोखले का ?

29 Oct 2019 19:30:38




नवी दिल्ली युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींनी जम्मू-काश्मीरमध्ये भेट दिल्यानंतर आता विरोधकांनी यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. यावर भाजपतर्फेही हल्ला चढवण्यात आला आहे. "काश्मीरमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखले का विमान पकडा खुशाल काश्मीरमध्ये जाअसा टोला भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.


ते म्हणाले, "काश्मीर जायचे असेल तर काँग्रेसवाल्यांनी सकाळी विमान पकडून खुशाल जावे. त्यांनी गुलमर्गला जा, अनंतनागला जा, फिरा, पर्यटन करा. तुम्हाला कोणी अडवले आहे का ? आता तर सामान्य पर्यटकांसाठीही काश्मीरचे खुले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर ज्यावेळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली होती. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये आता परिस्थिती निवळली आहे. सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

 

दरम्यान, युरोपियन संघाचे २३ प्रतिनिधी काश्मीर भेटीसाठी दौन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मिरचा विशेषाधिकार रद्द केल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपियन संघातील २३ खासदारांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी भारतात पोहोचले. जीओसी १५ जवानांची श्रीनगर येथे त्यांनी भेट घेतली. प्रतिनिधी मंडळातील खासदार बी.एन.डन यांच्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील सर्व सामान्य नागरिकांशी कलम ३७० बद्दल चर्चा केली जाणार आहे. हे मंडळ स्थानिकांशी चर्चा करण्यावर भर देणार आहे.

 

या दोन दिवसीय दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, या शिष्टमंडळाला जम्मू काश्मीर आणि लद्दाख क्षेत्रातील विविधता आणखी विस्तृतपणे समजण्यास मदत होईल. यासह रेल्वेतील सरकार संबंधी प्रार्थमिक परिस्थितीचीही माहिती घेता येईल.

Powered By Sangraha 9.0