राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सीएसआर पुरस्कारांचे वितरण

29 Oct 2019 13:59:45


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सीएसआर अर्थात खासगी क्षेत्राने बजावलेल्या सामाजिक उत्तरदायित्वासाठीच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्राचे ध्येय सध्या करण्याच्या दृष्टीने काही खाजगी संस्था आपले सामाजिक उत्तरदायित्व जपत आहेत याचा आनंद राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी व्यक्त केला. देशातील संतुलित समाजाचे ध्येय समोर ठेऊन ते सध्या करण्याच्या दिशेने काही संथ कार्यरत आहेत. आणि हेच ध्येय पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्याचा दीर्घकालीन प्रभाव समाजावर व्हावा यासाठी जातात आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, रोजीरोटी, जलसंधारण, स्वच्छता आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन या सर्व विषयांशी संबंधित या सीएसआर क्षेत्राशी निगडित असलेल्या संस्था सध्या देशभर कार्यरत आहेत. विकासाच्या आव्हानांना कायम ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सीएसआर कार्यातून पुढे येतील अशी आशा रामनाथ कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.


दरम्यान सामाजिक उत्तरदायित्वासंदर्भात उल्लेखनीय काम करणाऱ्या १९ निवडक कंपन्यांना आज हे पुरस्कार दिले गेले. समावेशक वृद्धी आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआरच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राकडून चालवल्या जाणाऱ्या चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.

Powered By Sangraha 9.0