स्वा. सावरकर स्मारकातर्फे रक्तदान शिबीर

27 Oct 2019 21:24:11
 


 

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, तिरंगा स्पोर्टस क्लब आणि सर्वोदय रुग्णालय, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवाळीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

हा सामाजिक उपक्रम आयोजित करून स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाने दिवाळीचा उत्सव समाजकार्यासाठी साजरा केला. यावेळी ४१ युनिट रक्त जमा झाले. यावेळी सावरकर स्मारकाचे सदस्य कमलाकर गुरव, व्यवस्थापक संजय चेंदवणकर, तिरंगा स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष अश्विन जाधव, उपाध्यक्ष अरविंद खैरे, चिटणीस सचिन जाधव, खजिनदार सुबोध साळवे, राहुल पवार, वैभव जावळे तसेच स्मारकाचे रितिका सुर्वे आणि उद्धव सोनावडेकर यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Powered By Sangraha 9.0