मदरशातील विद्यार्थ्याशी अश्लिल चाळे

07 Jan 2019 15:20:12
 
 

नंदूरबार : मदरशात शिक्षणासाठी राहणाऱ्या अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्यावर मौलानाने अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये घोडापीर मोहल्ला असलेल्या दारुल उलूम चिश्तिया मदरसामध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी मौलानाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लांना शिक्षणासाठी मदरसात पाठवणाऱ्या पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

नंदुरबार शहरात घोडापीर मोहल्ल्यात दारुल उलूम चिश्तिया मदरसा आहे. या मदरशात मौलाना हाफिज शेख आबिद हुसेन हा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करतो. मौलाना हाफीजने एका विद्यार्थ्याला मसाज करायला सांगितले.

 

त्यानंतर त्याने विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे व अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्याने रविवारी (ता.६) जानेवारीला रात्री पोलिस ठाण्यात याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंबंधी अधिक तपास पोलिस करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0